Posts

Showing posts from July 30, 2021

Rajaram Jadhao's story

Image
  Home     यशकथा यशकथा आम्ही लाखखिंडकर… By   NST Team  - July 30, 2021 0 59 माझे गावातील प्राथमिक शिक्षण संपल्यावर मला घर आणि गाव जरी सुमारे ४५ वर्षांपूर्वी सोडावे लागले, तरी माझे व माझ्या परिवाराचे ऋणानुबंध गावाशी कायमच जोडलेले आहेत….. सांगताहेत मंत्रालयातुन सहसचिव या पदावरून निवृत्त झालेले श्री राजाराम जाधव… यवतमाळ जिल्ह्यातील लाखखिंड हे आमचे गाव. माझे सातवी पर्यतचे प्राथमिक शिक्षण माझ्या लाख खिंड गावातच झाले. आमचे छोटेसे पण टुमदार गांव, गावाच्या तिन्ही बाजुने डोंगर, आजुबाजूला हिरवीगार वनराई, त्यामुळे निसर्गरम्य वातावरणामुळे गावात शांती सद्भावाचे वातावरण असायचे. गावात विविध देवी-देवतांची मंदिरे आहेत. त्यामुळे या सर्व मंदिरातून वर्षभर काही ना काही धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू असते. माझे गावातील सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील दहावी पर्यंतचे शिक्षण मोख येथील वसंत नाईक विद्यालयात झाले. पुढे मी बारावीची परीक्षा आर्णी येथील श्री महंत दत्तराम भारती विद्यालयातून उत्तीर्ण झालो, आणि पुढील शिक्षणासाठी पुसद नगरीतील आमच्या फुलसिंग नाईक महाविद्यालयात प्रवेश ...