Posts

Biodata Bhimniputra

 *बायोडाटा-* नांव-  मोहन गणुजी नायक राठोड   टोपण नांव - भीमणीपुत्र  पत्ता - मु.पो.चिंचखेड ता.किनवट जि.नांदेड,महाराष्ट्र  जन्म तारीख-  २ एप्रिल १९५० शिक्षण- बी.ए.प्रथम वर्ष. व्यवसाय - शेती  छंद - सामाजिक कार्य,वाचन,लिखाण.  विशेष-  - सहसचिव गॅदरींग,फुलसिंग नाईक महाविद्यालय पूसद जि.यवतमाळ   १९७२ - ग्राम स्नेह संमेलन स्थापना चिंचखेड  १९७२,२० वर्ष अध्यक्ष  - ग्राम स्नेह संमेलन प्रित्यर्थ दर वर्षी कबड्डी,व्हालीबाल सांघिक क्रिडा उत्सवाचे आयोजन.कुस्ती,रांगोळी स्पर्धा,बोनी बेबी कांपटेशन (सुदृढ बालक स्पर्धा,परिसंवाद,किर्तन,भजन स्पर्धा आयोजन. - गावात अनेक नाट्य प्रयोग सादर. - शामची आई आणि सोळावं वरीस धोक्याचं ही दोन नाटकं रंगभूमीवर सादर.झाडीबोली अभिनेत्री कु.शोभा जोगदेव,रागीणी बेडेकर नागपूर या नटी सोबत महत्वपूर्ण भूमिका.(२७/२९ डिसेंबर १९८७)  - दरवर्षी ग्रामस्नेह संमेलन प्रित्यर्थ   शंकर पट,कृषि प्रदर्शन,कृषी मेळावा,दुग्ध स्पर्धा आयोजन. - २१.११.१९८२ दहेली तांडा येथे अ.भा.बंजारा सेवा संघ,तालुका पातळीवर "बंजारा मेळाव...

Education

 *शिक्षणक्षेत्राची अधोगती : राष्ट्रासमोरील गंभीर आव्हान*      *- डॉ. अनमोल शेंडे*     *शिक्षण ही मुक्तीची प्रक्रिया आहे. चांगले काय आणि वाईट काय याचे भान जागविणारी शिक्षण ही सर्वोत्कृष्ट नैतिकता आहे. असुंदराला हद्दपार करीत आदर्श समाजाचे स्वप्न साकारणारी शिक्षण ही जीवंत प्रयोगशाळा आहे. क्रांतीने मोहरून येणारी आणि प्रतिक्रांतीचे गड उध्वस्त करणारी शिक्षण ही एक महाशक्ती आहे. समाजाचे मन सांस्कृतिक परिवर्तनाशी जोडत जीवनाला सुंदर पैलू पाडण्याचे काम शिक्षण करीत असून शोषणाच्या अदृश्य मुळांपर्यंत ताकदीने पोचण्याचे काम शिक्षण करीत असते. अनितीशास्त्राने घातलेला गोंधळ चव्हाट्यावर आणीत विवेकभान जागवण्याचे काम शिक्षण करते. प्रदुषणमुक्त नि निरभ्र माणूस जन्माला घालण्याचे काम शिक्षण करतेच; शिवाय राष्ट्राला देखणेपण बहाल करण्याचे कामही शिक्षण करते.*     *शिक्षण ही नवनिर्मिती आहे. अबोल अस्तित्वांना ओळख प्रदान करणारे आणि दुष्ट रचनेची संहिता नाकारून प्रज्ञानाचा बोधीवृक्ष सतत फुलवित ठेवणारे शिक्षण हे पहाटेचे स्वागतगीत आहे. शिक्षण म्हणजे परिवर्तन! शिक्षण म्हणजे ध्यास ! शि...

भाषावैविध्याची बोली*..... ------------------------------------------- *आसामी कवी नीलमणी फुकन आणि कोकणी लेखक दामोदर मावजो हे ' ज्ञानपीठ' चे मानकरी ठरल्याने, लिपी नसूनही भाषा जिवंत राहू शकते याचा प्रत्यय आला !*

 *भाषावैविध्याची बोली*..... ------------------------------------------- *आसामी कवी नीलमणी फुकन आणि कोकणी लेखक दामोदर मावजो हे ' ज्ञानपीठ' चे मानकरी ठरल्याने, लिपी नसूनही भाषा जिवंत राहू शकते याचा प्रत्यय आला !* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *ये निमतेती मन हनु वाटच की समस्त बंजारा समुदायेन बंजारा भाषाम (गोरबोलीम) भाषा व्यवहार करणों.. आन लेखकेन नम्र आवाहन छ की आपंण बंजारा भाषाम जास्तीत जास्त साहित्य निर्मिती करणों. आपंण भाषा यी निसता बोलीच छेयी तो भाषार से निकष पूर्ण करच. आपंण बोली भाषान लिपी नरी तरीही  बोलीभाषाम साहित्य निर्मिती करते रो ज्ञानपीठ पुरस्कारेवास तम निश्चितच पात्र ठरीयो.* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻  *भाषिक* वैविध्य असलेल्या आपल्या देशात दरवर्षी दिला जाणारा ' ज्ञानपीठ पुरस्कार ' हा एक भाषिक सोहळाच. यंदाच्या या सोहळ्याचे उत्सवमूर्ती आहेत आसामी कवी नीलमणी फुकन आणि कोंकणी लेखक दामोदर मावजो. या दोघांच्याही ज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्ताने कथा, कविता आणि कादंबरी या तिन्ही साहित्य प्रकारांचा गौरव झाला आहे . या दोन्हींमधली कोंकणी ही त्यातल्या त्यात मराठीला जवळची भौगोलि...

Rajaram Jadhao's story

Image
  Home     यशकथा यशकथा आम्ही लाखखिंडकर… By   NST Team  - July 30, 2021 0 59 माझे गावातील प्राथमिक शिक्षण संपल्यावर मला घर आणि गाव जरी सुमारे ४५ वर्षांपूर्वी सोडावे लागले, तरी माझे व माझ्या परिवाराचे ऋणानुबंध गावाशी कायमच जोडलेले आहेत….. सांगताहेत मंत्रालयातुन सहसचिव या पदावरून निवृत्त झालेले श्री राजाराम जाधव… यवतमाळ जिल्ह्यातील लाखखिंड हे आमचे गाव. माझे सातवी पर्यतचे प्राथमिक शिक्षण माझ्या लाख खिंड गावातच झाले. आमचे छोटेसे पण टुमदार गांव, गावाच्या तिन्ही बाजुने डोंगर, आजुबाजूला हिरवीगार वनराई, त्यामुळे निसर्गरम्य वातावरणामुळे गावात शांती सद्भावाचे वातावरण असायचे. गावात विविध देवी-देवतांची मंदिरे आहेत. त्यामुळे या सर्व मंदिरातून वर्षभर काही ना काही धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू असते. माझे गावातील सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील दहावी पर्यंतचे शिक्षण मोख येथील वसंत नाईक विद्यालयात झाले. पुढे मी बारावीची परीक्षा आर्णी येथील श्री महंत दत्तराम भारती विद्यालयातून उत्तीर्ण झालो, आणि पुढील शिक्षणासाठी पुसद नगरीतील आमच्या फुलसिंग नाईक महाविद्यालयात प्रवेश ...