Posts

Showing posts from September 12, 2020

याडीकार

 ¤ याडीचे महात्म्य समजून घेताना ¤ =======================  " याडी " या आत्मकथनाचे समीक्षण,    लेखक : याडीकार पंजाब चव्हाण, पुसद. ************************************** ✍️(c.) : डाॅ.वसंत भा.राठोड, मांडवी किनवट.  मो. नं. : 9420315409, 8411919665. **************************************               आईच्या महात्म्याचे गुणगान समाजातील अनेक लेखक, कवि, विद्वान, प्रज्ञावान अशा प्रतिभासंपन्न साहित्यिकांनी आपापल्या परीने केले आहे. आईची थोरवी गातांना दुधावरची साय, लेकराची माय म्हटलेले आहे. "हंबरून वासराले चाटती जेंव्हा गाय, तेंव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. "अशी अफलातून महिमा आईची गायीलेली आहे. मुलगा आई पुढे कितीही मोठा असला तरी तिच्या वात्सल्यापुढे लहानच असतो. एका कविने फार सुंदररित्या आपल्या कवितेतून अधोरेखित केले आहे. " आई तुझ्यापुढे मी आहे आजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. " एका शायराने तर आपल्या शब्द सामर्थ्याच्या बळावर आईचे महात्म्य अतिशय उंच शिखरावर नेऊन पोहोचविले आहे.  " शर्यत लगी विद्वानोंकी, एक शब्द मे ...